रत्नागिरी: रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मध्ये जय हो प्रतिष्ठान आणि भाजपातर्फे शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप व शालेय साहित्य वाटप असा कार्यक्रम नीलेश महादेव आखाडे यांनी आयोजित केला होता.
कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
जय हो प्रतिष्ठान व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आयटी जिल्हाप्रमुख नीलेश आखाडे यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे, जय हो प्रतिष्ठानचे प्रमुख राजू भाटलेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
राजेंद्र पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. नीलेश आखाडे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगत, जय हो प्रतिष्ठानने केलेली मदत, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या वह्या व श्री.आखाडे यांच्याकडून दिलेले शैक्षणिक साहित्य, यानंतरही कायम प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी काम करत राहणार असल्याचे सांगितले.
जय हो प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू भाटकर यांनीही जय हो प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाणारे सामाजिक काम सांगत नीलेश आखाडे यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
