संगमेश्वर:- लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा सावर्डे येथील केदारनाथ बहुउद्देशीय हॉलमध्ये सोमवार, दिनांक २९ जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शपथविधी व पदग्रहण अधिकारी म्हणून MJF PDG लाय. श्री. उद्धवजी लोध यांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीने शपथ घेतली.
या वेळी प्रमुख उपस्थितीत लाय. डॉ. कृष्णकांत पाटील होते. नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी लाय. प्रा. प्रकाश राजेशिर्के, सचिवपदी लाय. श्री. राजेश कोकाटे व खजिनदारपदी लाय. डॉ. अरुण पाटील यांनी पदग्रहण केले. या सोहळ्याचे आयोजन अत्यंत नेटके व उत्साही वातावरणात करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लब ऑफ सावर्डेच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. यावेळी लायन्स क्लब सावर्डेचे मावळते अध्यक्ष लाय. सतीश सावंत, संस्थापक अध्यक्ष लाय. गिरीश कोकाटे, माजी अध्यक्ष लाय. विजय राजेशिर्के, लाय. डॉ. कृष्णकांत पाटील, लाय. सीताराम कदम, लाय. अशोक बिजितकर, लाय. डॉ. अमोल निकम, आदिती निकम, लाय. डॉ. दर्शन पाटील, लाय. डॉ. समीर चिवटे, लाय. देवराज गरगटे, लाय. तुषार मोहिते (लायन्स क्लब चिपळूणचे माजी अध्यक्ष), लाय. कुलकर्णी सर, लाय. इंदुलकर सर, गॅलेक्सी क्लब चिपळूणचे माजी अध्यक्ष लाय. देवळेकर मॅडम, लाय. जाधव मॅडम, लाय. राठोड मॅडम, संगमेश्वर लायन्स क्लबचे अध्यक्ष लाय. शिंदे सर तसेच चिपळूणचे माजी सभापती सौ. पूजाताई निकम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लाय. देवराज गरगटे यांनी केले, तर लाय. गिरीश कोकाटे यांनी आभार मानले. नव्या कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
लायन्स क्लब ऑफ सावर्डेचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
