राजापूर: तालुक्याचे सुपुत्र राजेंद्र साळवी यांना तामिळनाडू राज्यातील दिंडीगुल येथे पार पडलेल्या स्पर्धेत फिडे स्टँडर्ड रेटिंग 1517 प्राप्त झाले आहे. राजापूर तालुक्यातील सर्वाधिक रेटिंग मिळवणारे खेळाडू म्हणून त्यांनी आपली नोंद केली आहे. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी आपल्या आवडीला व्यासपीठ मिळवून, जिल्ह्यातील अन्य खेळाडूंना प्रेरणा दिली आहे.
राजेंद्र साळवी हे प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून राजापूरमध्ये परिचित आहेत. सिद्धिविनायक पापड महिला गृह उद्योग, तसेच एल. आय. सी. (LIC) पॉलिसीधारकांकडून वेळेवर हप्ते जमा करून देणे या कामात ते नेहमी तत्पर असतात. त्यामुळे ते राजापूरचे लाडके व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
कठीण काळात आई-वडील आणि दोन मुलांना शिकवून स्वतःच्या पायावर उभे केलेले राजन साळवी आज संपूर्ण राजापूरच्या कौतुकाचा विषय ठरले आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.