GRAMIN SEARCH BANNER

रायगड: बुडालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी आधुनिक तंत्रज्ञान

रायगड: पावसाळी पर्यटन करण्यासाठी रायगड जिल्ह्यात अनेक पर्यटक हजेरी लावतात. मात्र पाण्याशी संबंधित असलेल्या ठिकाणी म्हणजेच समुद्र धबधबे याठिकाणी मनाई असतानाही चोरवाट शोधून , पोलिसांची नजर चुकवून जीव धोक्यात घालत असतात.

अशावेळी काही घटना घडल्यास तिथपर्यंत पोहचणे देखील अशक्य असते. अशा वेळी रेस्क्यू टीम आपला जीव धोक्यात धालून या मोहीमा करतात. यासाठी आधुनिक साधने असली तरी आव्हानात्मक काम संपलेले नाही.

खांदेरी येथे काही दिवसापूर्वी झालेल्या मच्छीमार बोटीतील तीन जणांचा शोध घेताना रोहा येथील रेस्क्यू टीम आणि थर्मल द्रोण चा वापर केला गेला. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनाऱ्यावर पुण्याहून आलेला युवक समुद्रात बुडाला होता. या युवकाचा मृतदेह शोधून काढण्यासाठी तटरक्षक दलाच्या हॅलिकॅप्टरचा वापर केला गेला, तरीही त्याचा शोध लागला नव्हता. अखेर सह्याद्री रेस्क्यू टीम थर्मल कॅमेरा लावलेल्या ड्रोनचा वापर केला. अखेर त्या मृतदेहाचे ठिकाण समजले, परंतु तिथे जावून मृतदेह बाहेर काढणे खूपच आव्हानात्मक होते. असाच प्रकार ३० जून रोजी माणगाव तालुक्यातील चन्नाट गावाच्या हद्दीतील एका धबधब्याच्या ठिकाणी घडला होता. मृतदेह शोधण्यापेक्षा तो अवघड वाटेने गावापर्यंत आणण्यात सहभागी बचाव पथकांचा कस लागला. उंच उंच डोंगरातील खडतर पायवाटेवरून मृतदेह बाहेर आणण्यामध्ये अगदी जिकरीचे बनले होते. काही ठिकाणी मृतदेह स्ट्रेचर व बोया रिंगच्या साह्याने नदीमधून बाहेर काढावा लागला, तर काही ठिकाणी अगदी स्ट्रेचरच्या साह्याने मृतदेह ओढत बाहेर काढावा लागला. यामध्ये पोलीस प्रशासन, शेलार मामा रेस्क्यू टीम तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था सहभागी झाली होती. अशा घटना रायगड जिल्ह्यात वारंवार घडत असून मागील दीड महिन्यात १६ व्यक्तांचा विविध घटनांमध्ये मृत्यू झाला. अशा घटना घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पर्यटनस्थळांवर निर्बंध घातले आहे, तरीही हौसी पर्यटक नव्या नव्या ठिकाणांचा शोध घेत तेथे मौजमजा लुटण्यासाठी जात असून यामुळे बचाव पथकाचे काम अधिकच वाढत चालले आहे.

धोकादायक पर्यटनस्थळावर पर्यटकांनी जाऊ नये यासाठी अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. परंतु ग्रामस्थ व पोलिसांची नजर चुकवून अतिउस्ताही पर्यटक धोकादायक ठिकाणी पोहचतात. रिल बनवण्याच्या नादात यातील अनेकजण आपला जीव धोक्यात घालतात. मुसळधार पाऊस आणि फेसाळणारे धबधबे आणि सह्याद्रीच्या उंचचउंच पर्वतरांगामध्ये हे पर्यटक बेधुंद झालेले असतात. अशातच हे उत्साही पर्यटक स्वतःचा जीव गमावून बसतात. अशी ठिकाणे दुर्गम भागात असल्याने तिथे तत्काळ मदतही मिळत नाही. सुरुवातीच्या गोल्डन अवरमध्ये बचावकार्य राबवता येत नसल्याने मोहिम मृतदेहाच्या शोधकार्यात रुपांतरीत होते. असे मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी येतात, असे सदस्यांचे म्हणणे आहे.

थर्मल ड्रोन म्हणजे, अशा प्रकारचा ड्रोनमध्ये थर्मल इमेजिंग कॅमेरा वापरलेला असतो. हा कॅमेरा इन्फ्रारेड किरणाद्वारे वस्तूंचे तापमाण ओळखतो आणि त्याचे थर्मल प्रतिमेत रुपांतर करतो. यामुळे दृष्टीला न दिसणाऱ्या उष्णतेच्या पातळीसह गोष्टी सहज पाहता येतात. थर्मल ड्रोनमुळे मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे पाहता येतात. ज्याचा वापर विविध क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणात केला जातो. रायगड जिल्ह्यात पर्यटकांच्या शोध मोहिमांमध्ये केला जात आहे.

सह्याद्री रेस्क्यू टीमचे अध्यक्ष म्हणाले की, अनेकवेळा दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस लागतात, तरीही मृतदेह सापडत नाहीत. त्यानंतर ते मृतदेह कुजण्याच्या स्थितीत असतात. प्रचंढ दुर्गंधी, निसरड्या वाटेने हे मृतदेह बाहेर काढून पंचनामा करावा लागतो. हा संपुर्ण कालावधी जसा नातेवाईकांसाठी तणावाचा असतो, त्याही पेक्षा शोधमोहिम राबवणाऱ्या बचाव पथकाला असतो. प्रत्येक क्षणाची बातमी होत असते. आणि अशा स्थितीत मृतदेह शोधण्यात आलेल्या अपयशाचा ताण देखील या पथकातील सदस्यांवर असतो. तहान, भूक विसरुन बचावपथकातील सदस्य निसर्गाच्या शक्तीला आव्हान देत काम करीत असतात.

Total Visitor Counter

2455622
Share This Article