पाचलच्या कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयाला आमदार किरण सामंत यांची सदिच्छा भेट

Gramin Varta
64 Views

पाचल/ तुषार पाचलकर : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैया) सामंत यांनी पाचल दौऱ्यादरम्यान पाचल ग्रामपंचायत इमारतीतील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयाला सदिच्छा भेट देत वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

यावेळी वाचनालयाचे ज्येष्ठ विश्वस्त व खजिनदार श्री. शिरीष सक्रे तसेच कार्यवाह श्री. विनायक खानविलकर यांच्या हस्ते आमदार किरण सामंत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

वाचनालयातील उपलब्ध सुविधा, पुस्तकांचा संग्रह तसेच प्रशस्त व सुसज्ज वाचनकक्षाची पाहणी आमदार सामंत यांनी केली. वाचनालयाची व्यवस्था आणि उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत वाचनालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी राजापूर पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदिनी कदम, पंचायत समिती सदस्या सौ. अपेक्षा मासये, वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री. राजन लब्दे, विश्वस्त श्री. श्रीकृष्ण सुतार, ग्रंथपाल श्री. विठोबा चव्हाण, लिपिक सौ. काव्या सुतार यांच्यासह वाचनालयाशी संबंधित पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पाचल परिसरातील वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी कार्यरत असलेल्या कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयाला आमदार सामंत यांच्या भेटीमुळे वाचनालयाच्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले.

Total Visitors :
4771230
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *