रत्नागिरी: लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय पाककला स्पर्धेत वीणा सागर कासेकर यांनी तयार केलेल्या ज्वारी राजा पोटली या पदार्थाला प्रथम क्रमांक मिळाला.
यावर्षी स्पर्धेचा विषय ज्वारीचे पदार्थ हा होता. या स्पर्धेसाठी तालुक्यातून ३५ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत सौ. साक्षी सम्राट पाटील (मोड आलेल्या ज्वारीचे कटलेट) द्वितीय, तर अंतरा राहुल कळंबटे (ज्वारीच्या खमंग वड्या) तृतीय आल्या. राजश्री राजकुमार औंधकर (ज्वारीच्या लाह्यांचा केक) आणि ओंकार रवींद्र पाथरे (ज्वारीचे शुगर फ्री मोदक) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सौ. प्रज्ञा जयंत फडके (ज्वारीची हेल्दी भेळ) यांना उत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक देण्यात आले.स्पर्धा गिरीश शितप आणि प्रतीक कळंबटे यांनी पुरस्कृत केली होती. सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्हे राजेंद्र डांगे यांच्या सौजन्याने देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण शेलार व ढोबाळे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर, प्रा. चंद्रमोहन देसाई, प्रा. हुसेन पठाण, प्रभाकर शितप, झरेवाडी ग्रामपंचायत सदस्या नेहा कळंबटे, गौरी शितप संस्थापकीय अध्यक्ष मनोजकुमार खानविलकर उपस्थित होते.यावेळी क्लबचे अध्यक्ष अॅड. अवधूत कळंबटे यांनी प्रास्ताविकात क्लबच्या सेवाकार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लबचे उपाध्यक्ष सचिन सावेकर यांनी केले.
क्लबतर्फे गेल्या दोन वर्षांत घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतील निवडक पाककृतींचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले असून या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रकाशनासाठी गिरीश शितप यांनी विशेष मेहनत घेतली.
रत्नागिरी : पाककला स्पर्धेत ज्वारी राजा पोटली प्रथम
