रत्नागिरी: पत्रकार बांधवांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी, समाजातील प्रत्येक घटकाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याच्या हेतूने भाजपा उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्यावतीने आज छत्री वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा प्रारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी डोंबिवली येथे केला. त्याच अनुषंगाने रत्नागिरीत पत्रकार बांधवांना, नागरिकांना छत्र्या देण्यात आल्या.
पत्रकार बांधवांचा सन्मान म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला डॉ. चंद्रशेखर निमकर यांचा उपक्रम समाजहितासाठी आदर्शवत ठरेल, अशा भावना या उपक्रमाचा प्रारंभ करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या.
रत्नागिरीतील कार्यक्रमाला प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, उमेश कुळकर्णी, राजेश तोडणकर, सचिन करमरकर, राजू भाटलेकर, सौ. पल्लवी पाटील, रत्नागिरीतील पत्रकार, नागरिक उपस्थित होते.
डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या पुढाकारातून शहरातील नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक राजेश तोडणकर, मुन्ना चवंडे, समीर तिवरेकर, उमेश कुळकर्णी, सौ. संपदा तळेकर, माजी नगरसेविका पल्लवी पाटील, माजी शहराध्यक्ष सचिन करमकर यांच्या हस्ते नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले.
रत्नागिरी : भाजप उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्याकडून पत्रकार, नागरिकांना छत्र्यांचे वाटप
