GRAMIN SEARCH BANNER

आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली

काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक संपन्न

रत्नागिरी – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने कंबर कसली असून, पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी एक महत्त्वाची बैठक सोमवारी काँग्रेस भवन येथे पार पडली. काँग्रेसचे सरचिटणीस रमेश कीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद आणि शहराध्यक्ष अशपाक कादरी यांची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत केवळ निवडणुकीची तयारीच नव्हे, तर पक्षाला नवीन बळ देण्यावरही भर देण्यात आला.

बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत उपस्थित पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आपले विचार आणि सूचना मांडल्या. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग रचनेबाबत बैठकीत सखोल विचारमंथन करण्यात आले. कोणत्या प्रभागात कोणत्या उमेदवाराला संधी द्यावी, जनतेच्या अपेक्षा काय आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. यासाठी समिती तयार करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. उदय पेठे,नंदन गांगण यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती   करण्यात येईल.

मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या सकारात्मक बदलांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या बैठकीत ते स्पष्टपणे दिसून आले. प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने, समर्पित भावनेने आणि पूर्ण ताकदीने काम करण्याची तयारी दर्शवली. एकंदरीत, ही बैठक केवळ निवडणुकीच्या तयारीपुरती मर्यादित नव्हती, तर ती काँग्रेस पक्षाच्या रत्नागिरीतील पुनरुज्जीवनाची नांदी होती. कार्यकर्त्यांचा हा उत्साह पाहता, आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष रत्नागिरीत चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस  रमेश कीर, जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, तालुका अध्यक्ष प्रसाद उपळेकर, शहराध्यक्ष अशफाक काद्री, उदय पेठे, नंदन गांगण, राजीव राणे,पांडुरंग कवितके, सुधीर वांगणकर, शैलेंद्र भाटकर, अस्लम शेख, जैनुल सारंग, इम्तियाज दंगीकर, , अशोक जाधव, , शकील भाटकर, , नासिर काझी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Total Visitor Counter

2474941
Share This Article