GRAMIN SEARCH BANNER

आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
18 Views

देवरुख :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांनी न्यू इंग्लिश स्कूल व गुरुवर्य काकासाहेब सप्रे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, देवरुख येथे तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धचे आयोजन केले होते. या स्पर्धेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

१९ वर्षाखालील गटात जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:-१. वेद प्रदीप लिंगायत-प्रथम (१२वी वाणिज्य).२. भाग्यलक्ष्मी गणेश मुळे- द्वितीय (१२वी संयुक्त- वाणिज्य).३. प्रणित मिलिंद मांडवे-चतुर्थ (१२वी वाणिज्य).४. साई प्रकाश हळदणकर-पाचवा (१२वी वाणिज्य).संघ व्यवस्थापक म्हणून क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांनी जबाबदारी संभाळली.
    
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी आणि पुढील स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी महाविद्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना समन्वयक प्रा. धनंजय दळवी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातील प्रा. प्रवीण जोशी, प्रा स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. वसंत तावडे तसेच प्रा. संदीप मुळये व प्रा. शिवराज कांबळे यांची उपस्थिती होती. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संसाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

2651854
Share This Article