देवरूखमध्ये विहिरीच्या जाळीत अडकलेल्या साडेपाच फुटी नागाला सर्पमित्र राजा गायकवाड यांनी दिले जीवनदान

saurabhsalvi26
346 Views

देवरूख: येथील मधली आळी (गुरववाडी) परिसरातील दिलीप गोखले यांच्या विहिरीवर लावलेल्या जाळीत सुमारे पाच ते साडेपाच फूट लांबीचा नाग अडकला असल्याची घटना आज सकाळी समोर आली. विहिरीवर संरक्षणासाठी लावलेल्या जाळीत हा नाग पूर्णपणे अडकून पडल्याची माहिती मिळताच, स्वस्तिक युवा प्रतिष्ठानचे आपत्कालीन आणि क्रीडा विभाग प्रमुख तथा सुप्रसिद्ध सर्पमित्र राजा गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ऐनवेळी प्रचंड धाडस आणि तत्परता दाखवत विहिरीच्या जाळीत अडकलेल्या या मोठ्या नागाला अत्यंत कौशल्याने सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्याला जीवनदान दिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजा गायकवाड यांनी केलेल्या या यशस्वी रेस्क्यूमुळे एकीकडे विहीर परिसरातील नागरिकांचा संभाव्य धोका टळला, तर दुसरीकडे एका वन्यजीवाचे प्राणही सुरक्षितरीत्या वाचले.

विहिरीच्या जाळीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढल्यानंतर या नागाला तातडीने वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. सर्पमित्र राजा गायकवाड यांनी यापूर्वीही परिसरातील अनेक सापांचे यशस्वीरीत्या रेस्क्यू करून त्यांना जीवनदान दिले आहे. वन्यजीव संवर्धनाबाबतची त्यांची मनापासूनची तळमळ, अंगातील धाडस आणि सातत्यपूर्ण सेवाभाव यामुळे संपूर्ण देवरूख परिसरात त्यांचे नेहमीच विशेष कौतुक होत असते. आज अत्यंत बिकट स्थितीत विहिरीच्या जाळीत अडकलेल्या नागाची सुटका केल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या धाडसी आणि समाजोपयोगी कार्याची प्रचिती आली आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहिलेल्या राजा गायकवाड यांच्या या कामगिरीमुळे सध्या स्थानिक नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत असून, सर्व स्तरांतून त्यांच्या या कौतुकास्पद कार्याचे गौरव करण्यात येत आहे.

Total Visitors :
4820520
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *