रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांना रेनकोटचे वितरण; प्रतिकूल हवामानात कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या सुरक्षेला प्राधान्य

Gramin Varta
296 Views

रत्नागिरी : जिल्ह्यात सागरी सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच विविध पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने पावसाळी रेनकोट वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला. दिनांक २४ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते उपस्थित होमगार्ड जवानांना रेनकोटचे वितरण करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पाऊस, प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक परिस्थितीतही होमगार्ड जवान सागरी सुरक्षा, किनारपट्टीवरील गस्त, विविध संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत असतात. अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षित, कार्यक्षम व अधिक सक्षमपणे कर्तव्य बजावता yaवे, या उद्देशाने या रेनकोटचे वितरण करण्यात आले. बैठकीदरम्यान, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत, पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी होमगार्ड जवानांच्या योगदानाचे कौतुक करत, कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच पावसाळ्यात स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत जबाबदारीने व दक्षतेने कर्तव्य बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Total Visitors :
4828059
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *