संगमेश्वर तालुक्यात १ सप्टेंबरपासून सलूनच्या दरात २०% वाढ; नाभिक समाज संघाचा निर्णय

Gramin Varta
172 Views

संगमेश्वर/वार्ताहर : वाढत्या महागाईचा फटका आता सलून व्यवसायालाही बसला असून, संगमेश्वर तालुक्यात १ सप्टेंबर २०२६ पासून सलून दरांमध्ये २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील केशकर्तनाचे दर आता बदलणार आहेत. बैठकीत सर्वानुमते निर्णय संगमेश्वर तालुका नाभिक समाज संघाची (रजि.) एक महत्त्वपूर्ण बैठक १३ जुलै २०२६ रोजी देवरुख येथील चव्हाण आळी येथे पार पडली. या बैठकीमध्ये सर्व नाभिक बांधवांनी चर्चा करून दर वाढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.

संघाचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनी सांगितले की, बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे हा निर्णय घेणे भाग पडले आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून संपूर्ण तालुक्यात हे सुधारित दर लागू केले जातील. ग्राहकांनी या दरवाढीला सहकार्य करावे, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :
4680932
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *