रत्नागिरी: नेवरेत घराच्या पडवीत भाजलेल्या अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
117 Views

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नेवरे-काजरभाटी येथे भाजलेल्या अवस्थेत आढळलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. नवनाथ दशरथ पाटील (वय ४९, रा. नेवरे-काजरभाटी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १०.४० वाजण्याच्या दरम्यान नवनाथ पाटील हे त्यांच्या राहत्या घराच्या मागील पडवीमध्ये भाजलेल्या अवस्थेत होते. ते वेदनेने ओरडत असल्याची माहिती त्यांच्या भाची अंकिता हिने फोनद्वारे अमित गुरुनाथ पाटील यांना दिली. त्यानंतर अमित पाटील यांनी शेजारील नागरिकांच्या मदतीने नवनाथ पाटील यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नवनाथ दशरथ पाटील यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८२/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. घटनेबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4772033
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *