रायगड: अलिबाग-रोहा मार्गावरील नांगरवाडी व सुडकोली येथील धोकादायक पुलांवरील वाहतूक लवकरात लवकर सुरु करण्यासाठी भारतीय लष्कराच्या अभियांत्रिकी विभागाची मदत घेण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी केली आहे.
एस.टी. वाहतूक बंद असल्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी व कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, जोग यांनी राज्याचे मुख्य सचिव, रायगडचे जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले आहे.
त्यांनी या पुलांवर तातडीने उपाययोजना करून वाहतूक पूर्ववत करण्याची, तसेच जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल जनतेसमोर सादर करण्याची मागणी केली आहे
अलिबाग-रोहा मार्गावरील पूल दुरुस्तीसाठी लष्कराची मदत घेण्याची मागणी
