GRAMIN SEARCH BANNER

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी नमिता किर तर कार्याध्यक्षपदी डॉ. प्रदीप ढवळ यांची फेर निवड

Gramin Varta
38 Views

रत्नागिरी: कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना अपेक्षित असलेले काम करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता किर यांनी दिली.

कोकणातील नवोदित साहित्यिकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुडाळ येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्त व केंद्रीय कार्यकारिणीची सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी निवड जाहीर करण्यात आली. संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सूचनेनुसार, अध्यक्षपदी पुन्हा एकदा सौ. नमिता रमेश किर यांची, तर कार्याध्यक्षपदी डॉ. प्रदीप ढवळ यांची फेर निवड करण्यात आली आहे.

विश्वस्त मंडळ: मंत्री डॉ. उदय सामंत, आमदार संजय केळकर, श्री. अनुप कर्णिक, श्री. प्रा. एल. बी. पाटील, श्री म. रेखा नार्वेकर, यांची आणि नवीन केंद्रीय कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली, ज्यात नमिता रमेश किर (केंद्रीय अध्यक्षा), प्रा. डॉ. प्रदीप जनार्दन ढवळ (केंद्रीय कार्याध्यक्ष), माधव अंकलगे (केंद्रीय कार्यवाह), प्रा. दीपा ठाणेकर (केंद्रीय कार्यवाह), आणि प्रकाश दळवी (केंद्रीय कार्यवाह) यांचा समावेश आहे.

या बैठकीत विविध समित्यांच्या प्रमुखांचीही घोषणा करण्यात आली, ज्यात झपुर्झा प्रकाशन समितीसाठी सौ. नमिता रमेश किर, कवी केशवसुत स्मारक व पुस्तकांचे गाव समितीसाठी श्री. गजानन पाटील, आणि महिला साहित्य संमेलन समितीसाठी सौ. उषा परब व सौ. वृंदा कांबळी यांचा समावेश आहे. युवाशक्ती प्रमुख म्हणून श्री. अरुण तुकाराम मोर्ये (दक्षिण कोकण) यांची निवड करण्यात आली.

या सभेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, कर्जत, ठाणे, पनवेल, नवी मुंबई, आणि मुंबई येथील जिल्हाध्यक्ष व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कुडाळ येथे झालेल्या बैठकीत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या घटना दुरुस्ती बाबत चर्चा होवून समिती स्थापन करण्यात आली आहे. यावेळी सौ. कीर आणि डॉ ढवळ यांनी बैठकीत विविध प्रश्नांवरील चर्चेला उत्तर दिले. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी नुतन कार्यकारिणीचा सत्कार केला.

Total Visitor Counter

2645823
Share This Article