चिपळूण : येथील शतकोत्तर हिरक महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रहालयाला कोकणातील मुस्लीम समाजातील स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी भांडी वस्तूसंग्रहालयाला भेट मिळाली आहेत. वाचनालयाला मुश्ताक आणि सईद देसाई बंधूंनी ही भांडी भेट दिली आहेत. या वस्तू मिळण्यासाठी वाचनालयाला रमण डांगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुस्लीम समाजात भांड्यांना आतून आणि बाहेरुन कल्हई केली जाते. अशी अनेक भांडी आता अभ्यासकांना पहायला मिळतील. सुमारे एक लाख रुपये किंमतीची ही भांडी भेट देऊन देसाई बंधूंनी संग्रहालयात महत्त्वाची भर घातली आहे. ‘लोटिस्मा’च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी देसाई बंधूंना उपरणे व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. यावेळी संस्थेचे संचालक प्रकाश घायाळकर, संजय शिंदे उपस्थित होते.
कोकणी मुस्लिमांच्या स्वयंपाकघरातील भांडी आता ‘लोटिस्मा’च्या वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळणार
