GRAMIN SEARCH BANNER

लांजा : राजकीय दबावाखाली बोलेरो अपघात प्रकरण दडपले; मृताच्या कुटुंबाला न्याय कोण देणार?

Gramin Varta
369 Views

लांजा/वार्ताहर :लांजा तालुक्याच्या पूर्व भागात २० जून २०२५ रोजी बोलेरोच्या धडकेत गोरगरीब व्यक्तीचा झालेला मृत्यू तीन महिने दडपून ठेवण्यात आला होता. अखेर पालांडे नामक व्यक्तीच्या पत्रामुळे या काळाकुट्ट कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे.

बसस्थानकावर निष्पापपणे उभ्या असलेल्या व्यक्तीला बोलेरोने रिव्हर्स घेताना चिरडून ठार केले. घटनेनंतर त्याला येथील दवाखान्यात नेण्यात आले; पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. तरीसुद्धा एका प्रभावी राजकीय व्यक्तीने आपला प्रभाव वापरून हा अपघात झाकण्याचा प्रयत्न केला. शवविच्छेदन न करण्यास भाग पाडून सत्य दाबण्यात आले. परिणामी एक महिला पतीविना आणि एक लहान मुलगी पित्याविना पोरकी झाली.

हा प्रकार केवळ अपघात नसून, राजकीय दबाव, धूर्तपणा आणि कायदा दाबण्याचा थेट प्रयत्न आहे. बोलेरोचा मालक, चालक आणि हे प्रकरण गुपचूप दाबून ठेवणारा राजकीय पुढारी – हे सर्वजण समानपणे जबाबदार आहेत.

पालांडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देऊन या तिघांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता प्रश्न असा – निष्पापाचा जीव घेणाऱ्यांना, आणि सत्य दडपणाऱ्यांना कायदा कधी आणि किती कठोर शिक्षा देणार?

Total Visitor Counter

3366880
Share This Article