देवरुख: कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली येथील क्रीडा संकुलात आयोजित तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करून सुयश संपादन केले. या तालुकास्तरीय स्पर्धेत पहिले दोन क्रमांक प्राप्त करणारे विद्यार्थी खेळाडू जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थी खेळाडूंचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी छोटेखानी कार्यक्रमात अभिनंदन करून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना प्रमुख प्रा. धनंजय दळवी यांच्यासह प्रा. प्रवीण जोशी, प्रा.अभिनय पातेरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कनिष्ठ महाविद्यालयाचे यशवंत विद्यार्थी खालील प्रमाणे:-
१. साईराज उमेश आंब्रे- उंच उडी: प्रथम क्रमांक.
२. वेदांत योगेश गवंडी- १००
मी. धावणे: प्रथम क्रमांक.
३. अक्षरा संदेश कांबळे- उंच
उडी: प्रथम क्रमांक आणि
लांब उडी: द्वितीय क्रमांक
४. पूर्वा विलास वेद्रे- १०० मी.
धावणे: प्रथम क्रमांक.
५. सार्थक प्रकाश आडशे-
गोळाफेक: द्वितीय क्रमांक.
आणि उंच उडी: तृतीय
क्रमांक
६. प्रथमेश शिवाजी जाधव-
४०० मी धावणे: तृतीय
क्रमांक.
७. अनुष्का महेश अंकुशराव-
गोळाफेक: तृतीय क्रमांक
मैदानी स्पर्धेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर आणि क्रीडा शिक्षक सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.