राजापूर | तुषार पाचलकर
राजापूर शहरानजीक कोंढेतडचे सुपूत्र प्रफुल्ल लांजेकर यांची शिवसेना डॉक्टर सेल (महाराष्ट्र प्रदेश) अंतर्गत कोकण फार्मा विभाग रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार कोकण विभाग फार्मा विंगचे अध्यक्ष राजेश घोसाळकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
प्रफुल्ल लांजेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून त्यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला असून, त्यांच्या या कार्याची सर्वत्र दखल घेतली गेली आहे.
शिवसेना डॉक्टर सेलच्या कोकण फार्मा विभाग रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी झालेल्या या नियुक्तीनंतर लांजेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रफुल्ल लांजेकर यांची शिवसेना डॉक्टर सेल कोकण फार्मा विभाग रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड
