GRAMIN SEARCH BANNER

सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलची (रत्नागिरी शहर) पालक शिक्षक संघाची सभा उत्साहात

रत्नागिरी : सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये (रत्नागिरी शहर) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाची पहिली सभा १२ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाली.

या सभेला व्यवस्थापिका सिस्टर आफ्रा, शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट, सुपरवायजर सिस्टर ऍनी, प्रायमरी हेडमिस्ट्रेस सिस्टर सुनीता यांच्यासह पाचवी ते दहावी वर्गांचे नवनियुक्त पालक प्रतिनिधी आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

शिक्षिका समरिन काझी यांनी जून आणि जुलै महिन्यात शाळेने राबविलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची आणि स्पर्धांची माहिती दिली. त्यानंतर मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट यांनी शाळेच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेऊन या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाची माहिती दिली. तसेच शाळेत कार्यरत असलेल्या विशाखा समिती, सुरक्षा समिती, परिवहन समिती, सखी सावित्री समिती यांविषयी माहिती दिली. या शैक्षणिक वर्षात पालक शिक्षक संघ एकत्रितरित्या उत्तम कामगिरी करेल आणि शाळेच्या प्रगतीचा स्तर उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यकारणीचे अध्यक्षपद मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट यांच्याकडे असणार असून, शिक्षिका अरिका तांडेल या सचिव, तर शिक्षिका अनुष्का धुपकर या खजिनदार म्हणून काम पाहणार आहेत. यावेळी या कार्यकारिणीवर पालक प्रतिनिधी म्हणून श्रद्धा सावंत सह सचिव म्हणून तर सुनीत घुडे यांची सह खजिनदार म्हणून एकमुखाने नियुक्ती करण्यात आली.

सूत्रसंचालन शिक्षिका अरिका तांडेल यांनी केले. शिक्षिका इच्छा नाईक यांनी सर्वांचे आभार मानले. ही सभा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.

Total Visitor Counter

2455622
Share This Article