दोन महिन्यांपासून ताप आणि खोकल्याने होता त्रस्त
रत्नागिरी : दोन महिन्यांपासून ताप आणि खोकल्याने त्रस्त असलेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान सिव्हिल रुग्णालय, रत्नागिरी येथे मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर विनायक वाडेकर (वय ४२ वर्ष, रा. आगवे, मोरेवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नंदकिशोर वाडेकर यांना गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यांच्यावर सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीलिंब आणि त्यानंतर सांबरे हॉस्पिटल (नाचणे, रत्नागिरी) येथे औषधोपचार सुरू होते. २७/०९/२०२५ रोजी नंदकिशोर वाडेकर घरी असताना त्यांना अचानक श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने २८/०९/२०२५ रोजी पहाटे ०४.२५ वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लांजातील तरुणाचा सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
