GRAMIN SEARCH BANNER

‘इस्लामपूर’चे ‘ईश्‍वरपूर’ नामांतर करण्यास केंद्र शासनाची मान्यता !

Gramin Varta
104 Views

मुंबई: जुलै महिन्यात राज्यशासनाने सांगलीतील ‘इस्लामपूर’ शहराचे ‘ईश्‍वरपूर’ असे नामांतर करण्यासाठीचा प्रस्ताव शिफारसींसह केंद्रशासनाकडे सादर केला होता.

या प्रस्तावास केंद्रशासनाने संमती दिली असून केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून त्याच्या मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे ‘इस्लामपूर’ हे नाव इतिहासजमा होऊन हे शहर आता ‘ईश्‍वरपूर’ याच नावाने ओळखले जाईल. आता ईश्‍वरपूर नगरपरिषद, ईश्‍वरपूर विधानसभा मतदारसंघ यांसह तालुका, जिल्हा अशा सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय, सर्व स्वरूपाचे व्यवसाय, उद्योगसंस्था अशा प्रत्येक स्तरावर हे नाव दर्शवले जाईल.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सदरचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. हा प्रस्ताव केंद्रशासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल, असेही त्यांनी त्या वेळी सांगितले होते.

‘ईश्‍वरपूर’ नावाच्या प्रवासाचा थोडक्यात इतिहास !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी ‘शहराचे नामकरण ईश्‍वरपूर करावे’, अशी मागणी ४-५ दशकांपूर्वी केली होती.यानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर १९८६ मध्ये यल्लमा चौका झालेल्या जाहीर सभेत ‘इस्लामपूर नव्हे, तर हे ईश्‍वरपूर आहे’, असा उल्लेख व्यासपिठावरून केला होता. त्यानंतर अनेक हिंदु बांधव आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हा पालट करण्याची मागणी शासनाकडे सातत्याने केली. आता त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

Total Visitor Counter

3386924
Share This Article