GRAMIN SEARCH BANNER

राजापुरातून बेपत्ता झालेली मुलगी अवघ्या 24 तासांत नातेवाईकांच्या ताब्यात, पोलिसांच्या मोहिमेला यश

Gramin Varta
543 Views

तुषार पाचलकर / राजापूर: राजापूर पोलिसांनी जलद गतीने कार्यवाही करत अवघ्या 24 तासांत नापत्ता झालेल्या 28 वर्षीय मुलीचा शोध लावून तिला सुखरूपपणे कुटुंबाच्या ताब्यात दिले आहे.

राजापूर पोलीस स्टेशन नापत्ता रजि. नं. 16/2025 नुसार, शबनम युसूफ पाटणकर (वय 28, रा. सौंदळ, मुसलमानवाडी, ता. राजापूर) ही दि. 25 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता घरातून कुणालाही न सांगता निघून गेली होती. वडील युसूफ पाटणकर यांनी तिचा परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात नापत्त्याची तक्रार दाखल केली.

शबनम ही काही काळापासून मानसिक उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने एका महिलेच्या मोबाईलवरून घरी फोन करून ती गोवा येथे असल्याचे सांगितले आणि घरी यायचे असल्याची इच्छा व्यक्त केली. थोड्याच वेळाने पुन्हा दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून ती पनवेलला जात असल्याचे आणि रेल्वेत बसल्याचे सांगितले.

या माहितीवरून राजापूर पोलिसांनी तत्काळ तांत्रिक विश्लेषणाद्वारे कॉल डिटेल्स आणि गाडीचे लोकेशन तपासले. त्यानुसार राजापूर रोड रेल्वे स्टेशन येथे मांडवी एक्स्प्रेस आल्यावर पोलिस पथक आणि मुलीचे नातेवाईक यांनी सर्व बोग्यांची पाहणी केली. त्यावेळी नापत्ता शबनम पाटणकर रेल्वेत बसलेली आढळून आली.

तिला सुखरूपपणे रेल्वेतून उतरवून तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. या जलद व समन्वयित कारवाईबद्दल राजापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

या कारवाईत PSI मोबीन शेख, पो.कॉ. घोगले, पो.कॉ. उकार्डे, पो.कॉ. शेलार, पो.कॉ. भेडसे, LPC वरक, HG तेली, HG ताम्हनकर, HG सकपाळे यांनी सहभाग घेतला.

ही संपूर्ण मोहिम पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कदम आणि राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Total Visitor Counter

3131105
Share This Article