GRAMIN SEARCH BANNER

मुंबई गोवा महामार्गाची माहिती आता क्युआर कोडमधून मिळणार

Gramin Varta
161 Views

पेट्रोलपंप, चार्जिंग स्टेशनपासून ते रुग्णालयांची लोकेशन सगळं काही एका क्लिकवर उपलब्ध

रत्नागिरी : कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर आता प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे. महामार्गाची माहिती, पेट्रोलपंप, चार्जिंग स्टेशनपासून ते रुग्णालयांची लोकेशन सगळं काही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासाठी संयुक्तरीत्या महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला असून महामार्गावर लवकरच ठिकठिकाणी विशेष क्युआर कोड फलक बसवले जात आहेत.

राज्यातील सर्व महामार्ग अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि माहितीपूर्ण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प आखला असून मुंबई-गोवा महामार्ग हा त्यातील पहिला टप्पा मानला जात आहे. या विशेष फलकावरील क्युआर कोड स्कॅन करताच ठेकेदाराची कामाची संपूर्ण माहिती, प्रकल्पाची लांबी, बांधकाम व देखभाल कालावधी अशा महत्वाच्या तपशीलांसह प्रवासातील आवश्यक सुविधा सहज पाहता येणार आहेत.

या क्युआर कोडमध्ये पेट्रोलपंप, पोलिस ठाणे, हॉटेल्स, ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन, टोलनाके, टायर-पंक्चर दुकानं, तसेच पुढील काही किलोमीटरमधील सर्व सेवा नकाशासह दिसणार आहेत. अपघात किंवा वाहनात अचानक बिघाड झाल्यास मदतीसाठी आवश्यक असलेला आपत्कालीन क्रमांक 1033ही यात उपलब्ध असल्याने त्वरित मदत मिळणे अधिक सोपे होणार आहे. गस्त पथक, ढोल व्यवस्थापक आणि संबंधित अभियंत्यांचे संपर्क क्रमांकही या क्युआर कोडमध्ये दिले जाणार आहेत.

महामार्गाला स्मार्ट स्वरूप देण्यासाठी क्युआर कोड फलक बसवण्याचे काम सुरू झाले असून येत्या काही दिवसांत प्रवाशांना ही नवी सुविधा प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

Total Visitor Counter

3367960
Share This Article