देवरूख-तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अंतर्गत व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा सबज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा दि.26 ते 28 डिसेंबर रोजी वासुदेव हॉल उद्यमनगर, बिहाइंड आर एस एन हॉटेल मुंबई गोवा हायवे कुडाळ डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग या स्पर्धेसाठी सुमारे ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लबचे खेळाडू फाईट मधुन लक्ष्मी मोघे, ऋतिक कांगणे,सोमांश सावंत, दुर्गा मोघे व पुमसे मधुन सोमांश सावंत व दुर्गा मोघे हे खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून त्यांना छोटेखानी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब देवरुख या ठिकाणी क्लबच्या उपाध्यक्षा ॲड.सौ पुनम चव्हाण,क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या वेळी तालुक्याचे प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी,क्लब सदस्या रूपाली कदम, पालक प्रतिनिधी अदिती लोध, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमित पवार,दुर्वा मोघे,पीहु कांगणे,मृण्मयी सावंत आदी मान्यवर उपस्थितीत होते.
या निवड झालेल्या खेळाडूंना तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, क्लब अध्यक्षा सौ.स्मिता लाड, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, देवरुख गावच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये,जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कर्रा, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्त्ये, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,जिल्हा प्रमुख प्रशिक्षक लक्ष्मण के,तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू, प्रशिक्षक साईप्रसाद शिंदे,टेक्निकल प्रमुख चिन्मय साने,क्लब सदस्या स्वाती नारकर,अनुजा नार्वेकर, अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे, राजेंद्र केदार,सिनियर खेळाडू सौरभ वनकर,निखिल लाड, सानिका प्रसादे, संकेत मापुस्कर,पंकज मेस्त्री,सिद्धी केदारी, गायत्री शिंदे,वेदांत गिडये,आशिष रसाळ आदींनी शुभेच्छा दिल्या.
सब ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी संगमेश्वरच्या तायक्वांडोपट्टूंची निवड






