GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : शीळ येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, कारचालकावर गुन्हा

Gramin Varta
276 Views

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे–रत्नागिरी मार्गावरील शीळ परिसरात कारने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल संगप्पा येनेगुरे (वय ५७, रा. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

या अपघातात यल्लफ्पा दरयाफ्पा जगदाने (वय ३१, रा. नराळे, ता. सांगोला, जि. सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी रोजी रविराज विनोबा राजके (वय २८, रा. सातारा) हे यल्लफ्पा जगदाने यांना दुचाकी (एमएच ४५ एके २८७२) वरून करबुडेहून रत्नागिरीकडे घेऊन जात होते. दुपारी सुमारे १ वाजता शीळ येथे आले असता समोरून येणाऱ्या कारने (एमएच ०८ झेड ३२६५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात यल्लफ्पा जगदाने यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीचालक रविराज राजके हे जखमी झाले. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी कारचालक अनिल येनेगुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Total Visitor Counter

3150537
Share This Article