खेड : तालुक्यातील अलसुरे गावाच्या हद्दीत रेल्वे रुळावरून जात असताना मालगाडीची धडक बसल्याने एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. १३ मार्च रोजी रात्री ९:३० ते १० वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवरील मैल दगड क्रमांक १००/०९ जवळ हा अपघात झाला. या धडकेत संबंधित व्यक्तीच्या डोक्याला, छातीला, हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच प्राण गेला. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी १४ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केला असून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ नुसार बेवारस मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्तीचे नाव-गाव अद्याप समजलेले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
खेडमध्ये रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू








