GRAMIN SEARCH BANNER

पाली बाजारपेठ येथे धावत्या एसटीत चालकाला मारहाण; भिवंडीच्या तरुणावर गुन्हा दाखल

Gramin Varta
188 Views

रत्नागिरी : ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाली बाजारपेठ येथे कर्तव्यावर असलेल्या एस.टी. चालकाला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. लांजा डेपोचे एस.टी. चालक मनोज भानुदास सोळंके (वय ३७) हे आपली एमएच-१४-एलएक्स-६९२७ क्रमांकाची बस घेऊन जात असताना, आरोपी आनंद माणिक सोनवणे (वय २५, रा. कोंडगाव, भिवंडी) याने त्यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी सोळंके यांनी आरोपीला शिवीगाळ न करण्याबाबत समज दिली असता, याचा राग अनावर झालेल्या आरोपीने चालकाला चालत्या बसमधून बाहेर ओढले. त्यानंतर त्याने चालकास मारहाण करत त्यांचा सरकारी शर्ट फाडून टाकला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

या घटनेनंतर चालक मनोज सोळंके यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी आनंद सोनवणे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता अधिनियम ५२/२०२६ नुसार कलम १३२, १२१(१), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. भरबाजारात शासकीय कर्मचाऱ्याला झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3246263
Share This Article