देवरुख दि. ३ :- संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर परिसरात संगणक वर्गासाठी जाणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून, त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केलेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित आरोपी हर्षल सुभाष गवंडी (वय २६, रा. पाटगाव) याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, संशयित आरोपी हा संगमेश्वर पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:३० ते १०:०० च्या सुमारास ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी देवरुख येथील संगणक वर्ग संपवून एस.टी. बसने ताम्हाणे फाटा येथे उतरल्या होत्या. तेथून त्या पायी मठधामापूर गुरववाडीकडे जात असताना, पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांचा पाठलाग सुरू केला.
मठधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आरोपीने आपली दुचाकी थांबवून आधी विद्यार्थिनींची टेहळणी केली. त्यानंतर काही अंतरावर पुन्हा विद्यार्थिनींच्या जवळ जाऊन चालत्या दुचाकीवर उभे राहून आपले कपडे उतरवत अश्लील कृत्य करून मनात लज्जा उत्पन्न केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.
यामुळे घटनेमुळे भयभीत झालेल्या विद्यार्थिनींनी घरी जाऊन पालकांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी एकत्र येवून मुलींना धीर दिला अशा विकृत मनोवृत्तीचा बिमोड होणेसाठी संबंधित मुलींनी एकत्र येत 2एप्रिल रोजी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७८, ७९ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपी हर्शल गवंडी याला अटक केली करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर हजर करण्यात येणार आहे. देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे याचे मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
आरोपी हर्शल हा वडीलांच्या अकाली निधनानंतर अनूकंपातत्वावर सरकारी नोकरीत असल्याने या घटनेची पंचायत समितीत जोरदार चर्चा सुरु आहे. दोन महिन्यापुर्वीही याच भागात विद्यार्थिनींबाबत असाच प्रकार घडला होता. त्यामुळे महिला व शाळकरी विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
देवरुख: विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील कृत्य; पंचायत समितीचा लिपिक पोलिसांच्या ताब्यात







