GRAMIN SEARCH BANNER

खेडच्या सुपुत्राची भारतीय सैन्य दलात उत्तुंग भरारी; रुपेश जाधव यांची लेफ्टनंट कर्नल पदी पदोन्नती

Gramin Varta
122 Views

खेड : तालुक्यातील कुरवळ जावळी (दत्तवाडी) या छोट्याशा गावातील सुपुत्र रुपेश मनोहर जाधव यांनी भारतीय सैन्य दलात आपल्या कर्तृत्वाने मोलाचा टप्पा गाठला असून, त्यांची ‘लेफ्टनंट कर्नल’ या वरिष्ठ पदावर पदोन्नती झाली आहे. जोधपूर येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात हा पदोन्नती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रुपेश जाधव यांचे वडील निवृत्त हवालदार मनोहर चंद्रू जाधव आणि त्यांच्या मातोश्री मनीशा मनोहर जाधव यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या मुलाच्या खांद्यावर लेफ्टनंट कर्नल पदाचे मानाचे स्टार लावले. एका निवृत्त सैनिकासाठी आपला मुलगा आपल्यापेक्षाही मोठ्या पदावर देशसेवा करत असल्याचे पाहणे, हा क्षण अत्यंत भावूक आणि अभिमानास्पद ठरला.

खेडसारख्या ग्रामीण भागातून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रुपेश जाधव यांनी सैन्य दलात मिळवलेले हे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. एका सामान्य कुटुंबातून येत भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या रुपेश यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मुलाच्या या प्रगतीमुळे आई-वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला असून, या सोहळ्यामुळे दत्तवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे खेड तालुक्यातील युवकांसमोर देशसेवेचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

Total Visitor Counter

3290939
Share This Article