GRAMIN SEARCH BANNER

लांजात बेकायदेशीर विदेशी दारू आणि बिअर जप्त; ६० वर्षीय महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
108 Views

लांजा: तालुक्यातील कोंडगे पहिलीवाडी येथे बेकायदेशीररी्या दारू विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवून ठेवलेला विदेशी दारू आणि बिअरचा साठा लांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एका ६० वर्षीय महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकूण ३,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंडगे पहिलीवाडी येथे राहणारी आरोपी महिला वैशाली गणेश कदम (वय ६० वर्षे) हिने आपल्या राहत्या घराच्या परसबागेत बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारू व बिअरचा साठा बाळगला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी २० मे २०२६ रोजी रात्री ८.०० वाजण्याच्या सुमारास कोंडगे पहिलीवाडी येथील आरोपीच्या घराच्या परसवान्यात छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना वेगवेगळ्या ब्रँडची विदेशी दारू आणि बिअर जप्त करण्यात यश आले.

या कारवाईत पोलिसांनी १३५ रुपये किमतीचे ‘लन्डर पिल्झनर’ बिअरचे १५ कंपनीबंद टीन (किंमत २,०२५ रुपये), १५० रुपये किमतीच्या ‘मास्टर डिलाईट व्हिस्की’च्या १८० मि.ली. मापाच्या ४ सीलबंद बाटल्या (किंमत ६०० रुपये) आणि २१५ रुपये किमतीच्या ‘ओल्ड माँक रम’च्या १८० मि.ली. मापाच्या ३ काचेच्या सीलबंद बाटल्या (किंमत ६४५ रुपये) असा एकूण ३,२७० रुपये किमतीचा बेकायदेशीर दारूसाठा हस्तगत केला. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल वैभावी रुपेश नारकर (बक्कल नंबर १२) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून २० मे २०२६ रोजी रात्री २३.२६ वाजता आरोपी वैशाली कदम हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर १०८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजा पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Total Visitor Counter

3403888
Share This Article