मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
चिपळूण (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण मनसेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मार्कंडी येथील भारतीय समाज सेवा केंद्र (अनाथाश्रम) येथे वस्तूरूपाने मदत करण्यात आली. या उपक्रमातून मनसे कार्यकर्त्यांनी गरजू आणि निराधार मुलांप्रती आपली सामाजिक जाणीव व्यक्त केली.
यावेळी अनाथाश्रमातील मुलांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला संदेश साळवी, स्वप्नील घारे, हमीद सय्यद, नंदूकुमार मनोरकर, निलेश जासूतकर, नितीन गोळवलकर, साहिल गायकर, ओम गांधी, अथर्व कापडी, सुरज घाग आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.







