GRAMIN SEARCH BANNER

दिल्लीनंतर आता पुणे; अभिजित दिपकेंनी केली कॉक्रोज जनता पार्टीच्या पुढील आंदोलनाची घोषणा

Gramin Varta
5 Views

मुंबई: नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी शनिवारी राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करत काँक्रोज जनता पार्टी आणि या पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी देशातील राजकीय वर्तुळासह प्रसारमाध्यमे आणि जनतेचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं.

दरम्यान, दिल्लीतील एकदिवसीय आंदोलनानंतर अभिजित दिपके यांनी अशी आंदोलने देशभरात करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, काँक्रोज जनता पार्टीने आता महाराष्ट्रीतीलपुणे येथे आंदोलनाची हाक दिली आहे. गुरुवार ११ जून रोजी हे आंदोलन पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात करण्यात येणार आहे.

या आंदोलनासंदर्भात अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर खास मराठीत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. भेटूया पुण्यात, जय महाराष्ट्र असं अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे.कॉक्रोज जनता पार्टीच्यावतीने हे आंदोलन गुरुवार ११ जून रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये संध्याकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आलं आहे. तसेच हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने होणार आहे, असेही कॉक्रोज जनता पार्टीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3484261
Share This Article