GRAMIN SEARCH BANNER

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर पावसाचा परिणाम; अनेक गाड्या विलंबाने

खेड: गुरुवारी (१९ जून) कोकण किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. यामुळे प्रवाशांना बराच काळ खोळंबून राहावे लागले.
नागपूर-मडगाव स्पेशल रेल्वे तब्बल ५ तास उशिराने मार्गस्थ झाली, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. याव्यतिरिक्त, आणखी ७ रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांनाही विलंबाचा फटका बसला. उधना-मंगळूर स्पेशल आणि दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस प्रत्येकी २ तास उशिराने धावल्या.

केरळ संपर्कक्रांती एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे, तर एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस १ तास विलंबाने धावली. निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस १ तास ३० मिनिटे, तर एलटीटी-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस १ तास उशिराने पोहोचली. करमाळी-एलटीटी वातानुकूलित स्पेशल देखील १ तासाने ‘लेट’ धावली.

Total Visitor

0218140
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *