देवरूख: येथील मातृमंदिर संस्थेच्या पशुसंवर्धन पदविका विद्यालयाच्या पहिल्या तुकडीचाच निकाल जाहीर झाला असून सर्व विद्यार्थी उत्तम मार्काने उत्तीर्ण होत १०० टक्के यशस्वी झाले आहेत.
नागपूरच्या म्हापसू विद्यापीठाशी सलग्न मातृमंदिर पशुसंवर्धन पदविका अभयासक्रम २०२३-२४ साली प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात देवरूख येथे सुरू झाला. रत्नागिरी जिल्ह्यात कृषी संलग्न दुग्धोत्पादन, पशुसंवर्धनासंदर्भात प्रशिक्षण देणारी कोणतीच शैक्षणिक सुविधा उपलब्ध नव्हती. मातृमंदिर संस्थेने नागपूर विद्यापीठाशी संलग्न पदविका अभयासक्रम सुरू केला. पहिल्याच वर्षी लाभलेल्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
मातृमंदिरच्या ओझरे फार्मवर २४ एकर प्रशस्त जागेत ही शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे. प्रशस्त गोठा, अत्यंत उच्च प्रतीची जातिवंत जनावरे, शेळ्या, कुक्कुटपालन युनिट, अद्ययावत लॅब आणि तज्ज्ञ प्राध्यापक यामुळे या अभयासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्याथ्यांची झुंबड उडत आहे. एलएमडीपी पदविका घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या अभूतपूर्व संधी उपलब्ध आहेत.
मातृमंदिर एलएमडीपी पदवी परीक्षा पास होणाऱ्यांमध्ये गौरव शामसुंदर कदम, कोमल सुभाष धावडे, राहू वेल्ये, निधी मेस्त्री, रोहित नटे या मुलांनी प्रथम वर्गात यश संपादन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष मेघना चाळके आणि संचालक मंडळाने त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वैभव आरडे (7741929141) आणि विनोद वाडकर (9423293072) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
देवरुख: मातृमंदिर पशुधन महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

Leave a Comment