GRAMIN SEARCH BANNER

पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अनंत मोहिते

लांजा : महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची कार्यकारिणी सभा नुकतीच झाली असून यामध्ये जिल्हाध्यक्षपदी अनंत मोहिते तर जिल्हा सरचिटणीस नरेश सावंत यांची निवड करण्यात आली.

सदर कार्यकारणी निवड रत्नागिरी येथे झालेल्या संघटनेच्या सभेमध्ये करण्यात आली. या सभेला जिल्हाभरातून जवळपास पन्नास ते साठ पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन निवड झालेल्या कार्यकारणीमध्ये जिल्हाध्यक्षपदी अनंत मोहिते, जिल्हा सरचिटणीसपदी नरेश सावंत, जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय डांगे, उपाध्यक्षपदी विश्वनाथ सुर्वे, प्रकाश कामेरकर, प्रविण त्रिभुवणे, इमनोज मिरगुले, कार्यालयीन चिटणीसपदी शितलकुमार आकुर्डे, कोषाध्यक्षपदी रघुनाथ गोरे, सहकोषाध्यक्षपदी सचिन कापसे, कार्यकारिणी सदस्यपदी सुनिल करंबेळे, उदय घाडी, राजेश गुरव, सूर्यकांत साळवी, प्रशांत दळवी, महिला प्रतिनिधी भारती तायशेटये, प्रियांका सनगरे, पुजा साळवी, विलेशा भोसले, प्रार्थना देसाई, संघटकपदी संजय कुळये, प्रबोध चव्हाण, संदीप मोहिते, समीर घडशी, प्रसिद्धी प्रमुख राजेश गोसावी, सल्लागार चंद्रकांत पावसकर, संजय दरेकर, अशोक भालेकर, विजय जाधव, उदय शिंदे, संदीप कालेकर, दयानंद लाखण यांची निवड करण्यात आली.
      
दरम्यान, नुतन पदाधिकाऱ्यांचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर, माजी जिल्हा सरचिटणीस दिपक माळी तसेच उदय शिंदे आदींनी अभिनंदन केले. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Total Visitor

0218397
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *