देवरूख: शिवसेना संगमेश्वर तालुक्याच्या वतीने देवरूख येथे आयोजित पारंपरिक कोकणी महिला लोकनृत्य स्पर्धेत कासे येथील केदारनाथ ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या श्रावण महोत्सवाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शहरातील मराठा भवन सभागृहात हा महोत्सव पार पडला, ज्यात एकूण २१ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत वरदान देवी कडवई संघाने द्वितीय क्रमांक, तर अमृता ग्रुप संगमेश्वरने तृतीय क्रमांकाची बाजी मारली. उत्तेजनार्थ म्हणून धनी देवी तळवडे या संघाची निवड करण्यात आली. विजेत्या संघांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार डॉ. सुभाष बने, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, उपजिल्हाप्रमुख राजेश मुकादम, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, उपजिल्हाप्रमुख भाग्यश्री सुर्वे, संघटक रेश्मा परशेट्ये, माजी जि.प. सदस्या राना महाडीक, प्रमोद पवार, अभिजीत शेट्ये, प्रसाद सावंत, सचिन मांगले, दिलीप सावंत, सनी प्रसादे, बाळा माने, पप्पू गायकवाड, कृष्णा हरेकर, समीक्षा बने, नेत्रा शिंदे, सारिका जाधव, दीपा प्रभावळकर आदी मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून रेश्मा हेगिष्टे, प्रशंसा डाऊल व योगेश मोहिते यांनी काम पाहिले.
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकीने काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सेजल गवंडी, ज्योती जाधव, पूनम लिंगायत, मनीषा मोहिरे, आदिती जाधव, राखी रसाळ, प्रियंका जाधव, साक्षी नटे, अनामिका कनावजे, शिवानी जाधव यांचा समावेश होता.