रत्नागिरी : रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यंदा पुन्हा राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सव म्हणजेच ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आला असून, त्याचे रत्नागिरी येथे शनिवार, दि. २४ ऑगस्ट रोजी
खारवी समाज सभागृह उद्यमनगर रत्नागिरी येथे प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रप्रमुख समीर इंदुरकर समन्वयक डॉ. आनंद आंबेकर आणि श्री.सुनील बेंडखळे यांनी दिली.
पारितोषिकप्राप्त निवडक एकांकिकेची अंतिम फेरी मुंबई येथे १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा – माहीम, मुंबई येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातून ९ एकांकिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून, दि. २४ ऑगस्टला सकाळी ८ वाजता उद्घाटन झाल्यानंतर स्पर्धेत सुरुवात होणार आहे.अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या कार्यकारी सदस्यांमध्ये मीटिंग होऊन चिठ्ठी टाकून लोडस पाडण्यात आले खालीलप्रमाणे एकांकिका होणार आहेत.
१.इंद्रधनु प्रतिष्ठान पानवल घवाळी वाडी सादर करीत आहे एकांकिका पयल नमन
२.नाट्य वात्सल्य,रत्नागिरी
रावणायन
३.नाट्य शोध रत्नागिरी सादर करीत आहेत तुती
४.सृजन द क्रिएशन सादर करीत आहेत फ्रीडम ॲट मिडनाईट
५.गोगटे जोगळेकर महाविद्यालय सादर करीत आहेत विसर्जन
६.एल. एस. पी. कॉलेज शिवार आंबेरे सादर करीत आहेत गडप
७.संकल्प कलामंच रत्नागिरी सादर करीत आहेत एटीन प्लस
८.महाराजा फाउंडेशन सादर करीत आहेत कॉफीन
९.जस्ट थिएटर थिंग्स सादर करीत आहेत नाही मी बोलत
या स्पर्धेला रत्नागिरी जिल्ह्यातील नाट्यरसिकांनी उपस्थिती देवून, स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अ.भा.मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले केंद्रप्रमुख समीर इंदुलकर, समन्वयक डॉ. आनंद आंबेकर आणि श्री.सुनील बेंडखळे यांनी केले आहे.