GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग; प्रवासी थोडक्यात बचावले

Gramin Varta
7 Views

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली.

मालवणच्या दिशेने निघालेली एम.एच. ०२ एफ. जी. २१२१ ही लक्झरी बस मुंबईहून प्रवास करत असताना अचानक आग लागली.

बसचे मालक ओमकार मागले असून, वाहन चालक सचिन लोके यांनी तत्परता दाखवत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस व अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Total Visitor Counter

2647033
Share This Article