GRAMIN SEARCH BANNER

कोकणवासियांसाठी भाजपतर्फे 350 एसटी बस आणि ट्रेनची मोफत सुविधा

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी दाखवला एसटीला भगवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मुंबई भाजप तर्फे 350 एसटी बस आणि ट्रेनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आज मुंबई भाजप अध्यक्ष तथा राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड् आशिष शेलार यांनी एसटीला भगवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ केला.

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मुंबई भाजप तर्फे दरवर्षी एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते यावर्षी साडेतीनशेहून अधिक गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजपासून मुंबईच्या विविध भागातून या गाड्या कोकणाकडे रवाना होणार आहेत. बीकेसी मध्ये या गाड्यांचा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून आज याच ठिकाणी नारळ वाढवून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार संजय उपाध्याय, सुहास आडिवरेकर, कमलाकर दळवी, जितेंद्र राऊत आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

याबाबत बोलताना ॲड् आशिष शेलार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने कोकणवासीयांना आणि गणेशभक्तांना संपूर्णतः आपल्या बाजूने सेवक राहणं आणि मदत करणं ही भूमिका सतत्याने घेतली आहे. म्हणून गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी एक विशेष ट्रेन सुरु केली. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी बोलून कोकणात अधिकच्या रेल्वे जाण्यासाठी योजना केली. ⁠आमचे खासदार, आमदार, माजी नगरसेवक आपल्या विभागातून कोकणवासीयांना त्यांच्या गावी सुखरूप जाण्यासाठी वाहन व्यवस्था कार्यक्रम करत आहेत.

⁠मुंबई भाजपा म्हणून ३५० बसेस आम्ही सोडत आहोत. तर 25 तारखेला एक स्वतंत्र ट्रेन कोकणात रवाना होणार आहे.

Total Visitor Counter

2474807
Share This Article