ऑनलाइन तक्रार दाखल, नावेही केली उघड, पोलिस अधीक्षक कारवाई करणार का?
रत्नागिरी : राज्यात अवैध जुगार, मटका आणि ऑनलाइन लॉटरी व्यवसायांवर बंदी असताना रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये मात्र हे धंदे उघडपणे आणि जोमात सुरू असून गणेशोत्सवात व्यावसायिकांची चांदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहेत. याबाबतची ऑनलाइन तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गुन्हे शाखेचे उपअधीक्षक तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांकडे करण्यात आली आहे.
तक्रारीत नमूद केले आहे की, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध मटका व्यवसाय व ऑनलाइन सट्टेबाजी चालू आहे. यामुळे तरुणाई बरबादीच्या मार्गावर जात असून सामाजिक वातावरण बिघडत आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही हा धंदा बेधडक सुरू असल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
या अवैध धंद्यात सामील असलेल्या काहींची नावे देखील उघड करण्यात आली आहेत. यामध्ये मटका किंग, लॉटरी किंग पेटकर, लकारे, नारकर, माने, खेडेकर आदींचा समावेश आहे. उर्वरित मटका किंग आणि लॉटरी किंगची नावे पोलिस अधीक्षकांकडे देण्यात येणार आहेत. पोलिस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने बंदी घातलेल्या या धंद्यांकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारत हिंदू महासभेचे स्वप्नील खैर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यांच्याकडे ऑनलाइन करण्यात आलेल्या तक्रारी
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.
मा. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.
मा. पोलीस उपअधीक्षक (गुन्हे) रत्नागिरी.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजापूर.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रत्नागिरी शहर.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रत्नागिरी ग्रामीण.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लांजा.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संगमेश्वर.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुहागर.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिपळूण.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिरगाव.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खेड़.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दापोली.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मंडणगड.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जयगड.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दाभोळ.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाटे.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवळख.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पूर्णगड.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणकोट.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सावर्डे
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मटका, ऑनलाइन लॉटरी व्यवसाय फोफावला; पोलिसांचे दुर्लक्ष?
