GRAMIN SEARCH BANNER

खेड : म्हशींना पाणी पाजण्यासाठी धरणात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

खेड : खोपी पिंपळवाडी धरणात म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बाबाराम मालसिंग ढेबे (36, रा. खोपी–रामजीवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

ढेबे हे नेहमीप्रमाणे म्हशींना घेऊन धरणाजवळ पाणी पाजण्यासाठी उतरले होते. मात्र पाय घसरून ते पाण्यात खोलवर गेले आणि स्वतःचा तोल जाऊन बुडू लागले. काही क्षणांतच त्यांची हालचाल थांबली. ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना पाण्याबाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3484526
Share This Article