खेड (प्रतिनिधी) – खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिनदर्शिका प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी भरणे येथील श्री काळकाई देवी हॉलमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चांदिवडे यांनी भूषवले होते, तर खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी खेड तालुक्यातील कुणबी समाजातील अनेक मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये उद्योजक सुरज जोगळे, माजी सभापती शांताराम चीनकटे, कुणबी समाज उन्नती संघ खेडचे अध्यक्ष कृष्णा आग्रे, सचिव सचिन गोवळकर, बाळू सनगरे, मंगेश बुरटे, रवींद्र रेवाळे, केंद्रप्रमुख विलास धामणे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक रवींद्र हरावडे, दत्ताराम हंबीर आदी मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी कुणबी कर्मचारी संघाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याचा गौरव केला. संघाच्या माध्यमातून समाजातील कर्मचारी एकत्र येत असून, सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून समाजाची ओळख, संस्कृती आणि उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
हा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी संघाचे सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, कोषाध्यक्ष संतोष गांगरकर, उपाध्यक्ष प्रकाश कोदारे, नरेश ठोंबरे, निलेश कांदेकर, शरद कदम, रवींद्र हरावडे, प्रमोद म्हादे, सल्लागार विजय बाईत, विलास धामणे, तुकाराम काताळे, सहसचिव संदीप घाणेकर, राजेश भागणे, नवनीत घडशी, तालुका संपर्कप्रमुख संजय जाधव, भागोजी कडव, सचिन गावडे, मुख्य संघटक मनोहर मनवळ, संजय चांदिवडे, दीपक खाडे, प्रदीप घाणेकर, प्रसिद्धीप्रमुख शशिकांत भुवड तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
महिला प्रतिनिधी म्हणून ऋतुजा चांदिवडे, रसिका रेवाळे, मनीषा बैकर, सिद्धी जाधव, तृप्ती काताळे, ऋतुजा तांदळे, सनीरीता बाईत, विद्या घडशी, दर्शना शिगवण, अंकिता भागणे, सुमेधा फागे आणि स्नेहल गावणकर यांनीही कार्यक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश ठोंबरे यांनी केले. उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि समाजबांधवांच्या उपस्थितीमुळे हा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा एकत्रितपणा, उत्साह आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा ठरला.





