GRAMIN SEARCH BANNER

लांजात बकरी ईद निमित्त पोलिसांनी साधला मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार मुस्लिम बांधवांसोबत संवाद

Gramin Varta
272 Views

लांजा: बकरी ईद निमित्त लांजा तालुक्यातील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार मुस्लिम बांधवांसोबत उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी लांजा पोलीस ठाणे येथे संवाद साधला.

मुस्लिम समाजात बकरी ईदला विशेष महत्व असून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने लांजा तालुक्यातील मुस्लिम बांधवांसोबत संवाद साधण्यासाठी गुरुवार २१ मे रोजी सकाळी ११ वाजता लांजा पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत ही संवाद बैठक पार पडली.

यावेळी आगामी काळात बकरी ईद असल्याने सदर उत्सव काळात लांजा शहरासह तालुक्यातील गावांमध्ये शांतता राहावी याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गोवंश कायद्याचे तंतोतंत पालन करावे, जनावरांची अवैधरित्या वाहतूक करू नये. तसेच सोशल मीडियावरील फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसेच सामाजिक सलोखा अबाधित यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.

दरम्यान, यावेळी उपस्थित सदस्यांनी पोलिस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक करत पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आणि लांजा शहरासह तालुक्यात सलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केला. याप्रसंगी बैठकीला लांजा शहरासह तालुक्यातील विविध गावांतील मुस्लिम समाजाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

Total Visitor Counter

3485594
Share This Article