दापोली : तालुक्यातील गावतळे हनुमानवाडी येथील जंगलात काजूच्या झाडाखाली अवैध हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:१० वाजताच्या सुमारास घडली.
दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कैलास क्षीरसागर (क्रमांक १६१७) यांनी फिर्याद दिली आहे. नारायण गणू ठोंबरे (वय ४४, रा. शेरवली पिशचवाडी, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून ९०० रुपये किमतीची ९ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले, ज्याची एकूण किंमत ९०५ रुपये आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गु.र.नं. १३५/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.